⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

वनपट्टे धारक व वनदावे प्रलंबित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यातील वनपट्टे धारक व वनदावे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चातर्फे करण्यात आली. दरम्यान, या मागणीचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले.

उत्तर महाराष्ट्रातील तसेच ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अशा जिल्ह्यातील वनपट्टे धारक व ज्यांचे वनदावे प्रलंबित आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना २०२१ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. सोमवार दि.१८ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांना हे देण्यात आले. निवेदन देतेवेळी कुऱ्हा भागातील लालगोटा, डोलारखेडा, मधापुरी, वायला, येथील आदिवासी व गावकरी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.