⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महापौरांच्या निवासस्थानी दगडफेक, ८ संशयितांना अटक

महापौरांच्या निवासस्थानी दगडफेक, ८ संशयितांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ सप्टेंबर २०२२ | जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन व जळगाव शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निवासस्थाना समोर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. याप्रकरणी आणखी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली होती.

मंगेश नाईक, भरत आंधळे, सागर लाड या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आज अजून आठ संशयतांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रताप शिखरे यांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधितांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिसारे, दत्तात्रय बडगुजर, सचिन मुंडे करत आहेत.

योगेश नाईक, तेजस वाघ, अजय सांगळे, किरण नाईक, तेजस घुगे, दिलीप नाईक, रामेश्वर सानप, सर्व राहणारे साईबाबा मंदिर जवळ मेहरूण. तसेच महेश लाड राहणारा कुंभारवाडा मेहरून अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण
जळगाव जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना रात्री ११ वाजता मात्र जळगाव शहरात एक अनुचित प्रकार घडला होता. मेहरुण परिसरातील महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निवासस्थानावर एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान जळते फटाके, गुलाल, व दगडाची फेक केली होती.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह