शेअर बाजार मोठ्या घसरणीसह झाला बंद, सेन्सेक्स 714 अंकांनी घसरला

एप्रिल 22, 2022 4:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । आज (२२ एप्रिल) देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. यामुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 714 अंकांपेक्षा अधिक घसरला, तर निफ्टी 17200 च्या खाली बंद झाला. सेन्सेक्समध्ये 714.53 अंकांची घसरण दिसून आली आणि तो 57,197.15 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 220.65 अंकांनी घसरून 17171.95 वर बंद झाला.

share market 1

यूएस मार्केटमध्ये घसरण
शुक्रवारी सकाळी ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तत्पूर्वी, अमेरिकन बाजारात डाऊ जोन्स 370 अंकांनी घसरला आणि दिवसाच्या खालच्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी नॅस्डॅक 2 टक्क्यांनी घसरला आहे. आयटी समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकी बाजाराची सुरुवात चांगली झाली असली तरी. नेटफ्लिक्सचा शेअरही ३.५ टक्क्यांनी घसरला आहे.

गुरुवारी बाजारात तेजी होती
याआधी गुरुवारी भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वधारला होता. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 874 अंकांनी 57,911.68 वर तर निफ्टी 256.05 अंकांनी वाढून 17,392.60 वर बंद झाला. याआधी सेन्सेक्सने सलग पाच व्यापार सत्रांमध्ये सुमारे ३ हजार अंकांची घसरण नोंदवली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now