जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे, कोरोनामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी आज २८ डिसेंबर रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.नवी तारीख लवकरच घोषित होणार आहे. वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय, क्रमांक : सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.६१/कार्या-१२, दिनांक १७ डिसेंबर, २०२१ अन्वये शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक ०२ जानेवारी, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२२ पुढे ढकलण्यात येत आहे. २.परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
हे देखील वाचा :
- Jalgaon : दुकान फोडून तांब्याची चोरी, पोलिसांनी दोघा चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
- MUHS अंतर्गत डॉ. उल्हास पाटील रूग्णालय सुपर स्पेशालिटी कोर्सेस सुरू करणारे महाराष्ट्रात ठरले पहिले खाजगी वैद्यकीय महाविद्यालय
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदानाद्वारे छत्रपती शंभूराजे यांना अभिवादन
- .. तेव्हाच अजित पवारांनी ऑफर दिली होती ; एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
- शाब्बास पोरी..! जळगावात बेवारस सापडलेल्या मुलीने 10वीत मिळविले 89 टक्के गुण