जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर होणार सर्वात अद्ययावत उपचार!

जून 11, 2026 6:05 PM

अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी ओळखल्या जाणार्‍या महादेव हॉस्पिटल, जळगाव येथे मुतखड्यावरील उपचारांसाठी अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. या अत्याधुनिक लेझर मशिनचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

mhj1

यावेळी प्रा. व विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर, प्रा. डॉ. हर्षद चौहान, डॉ. शुभम चौधरी, डॉ. श्रीकांत रेड्डी, प्रा. डॉ. रघुनाथ बराटे आणि डॉ. ननिता चौधरी आदी उपस्थीत होते. यावेळी बोलतांना प्रसिध्द युरोलॉजीस्ट डॉ. हेमंत केळकर यांनी मूत्रपिंड व मूत्रमार्गातील खड्यांवर शस्त्रक्रियेशिवाय किंवा अत्यल्प चिरफाड करून उपचार करण्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी मानली जाते. लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खड्यांचे सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर करून ते सुरक्षितपणे बाहेर काढले जातात. त्यामुळे रुग्णाला कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी कालावधीचा रुग्णालयातील मुक्काम आणि जलद पुनर्वसनाचा लाभ मिळतो.

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी महादेव हॉस्पिटलमध्ये या अत्याधुनिक उपचारांचा लाभ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होणार आहे असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महादेव हॉस्पिटलच्या आधुनिक आरोग्यसेवा उपक्रमांचे कौतुक करत, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी अशा सुविधा मोठा दिलासा ठरणार असल्याचे सांगितले.अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्णकेंद्री सेवा यामुळे महादेव हॉस्पिटल जळगावच्या आरोग्यसेवेत नवा आदर्श निर्माण करीत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories