महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी सेवेचा प्रारंभ

मे 11, 2026 4:49 PM

मुबंई किंवा पुणे जाण्याची गरजच नाही आधुनिक उपचार पद्धती आता जळगावमध्ये उपलब्ध

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सुप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण पाटील तसेच डॉ. पावन चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक व कमी त्रासदायक उपचार पद्धती आता जळगावकरांसाठी उपलब्ध होणार आहेत.

MH

या विभागामध्ये युटेरिन फायब्रॉईड एम्बोलायझेशन, व्हेरिकोज व्हेन्सचे लेसर व ग्लू उपचार, अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, डायलिसिस फिस्टुला प्रक्रिया, ट्यूमर एम्बोलायझेशन, इमेज गाईडेड बायोप्सी, बायलीरी ड्रेनेज व स्टेंटिंग, नेफ्रोस्टॉमी, पीआयसीसी लाईन व सेंट्रल व्हेनस अ‍ॅक्सेस तसेच डीव्हीटी इंटरव्हेन्शन्स यांसारख्या विविध अत्याधुनिक प्रक्रिया करण्यात येणार आहेत. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही अत्याधुनिक उपचार पद्धती असून मोठ्या शस्त्रक्रियेविना फक्त सूक्ष्म छिद्राद्वारे उपचार केले जातात.

त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्त्राव, कमी हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी आणि जलद आरोग्यलाभमिळतो. महादेव हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह अनुभवी तज्ज्ञांची सेवा उपलब्ध झाल्याने जळगाव व परिसरातील रुग्णांना महानगरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. अधिक माहितीसाठी व अपॉइंटमेंटसाठी संपर्क : ६३५९७१५०५५.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now