जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथिल राहीवाशी तथा वर्डी हायस्कुल चे पर्यवेक्षक एसपी महाजन यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव कडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला. सदर पुरस्काराचे वितरण अल्पबचत भवन जळगाव येथे करण्यात आले. यावेळी आ सुरेश भोळे,मा महापौर विष्णु भंगाळे,गोदावरी फाउंडेशन चे डॉ.केतकी पाटील,ज्ञानेश्वर वाघ, सुरेश पाटील,राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेचे संचालक आदी उपस्थित होते.
महाजन यांना या अगोदरही धुळे येथिल रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलेपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल मा विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी,चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती कल्पना पाटील,राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,उपसभापती माणिकचंद महाजन,सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी एस महाजन,चेअरमन सुखदेव पाटील,संस्थेचे आजीव सदस्य जगदिशकुमार पाटील,प्राचार्य के एन जमादार,उपमुख्याध्यापक मनोज चव्हाण,पर्यवेक्षक नवल महाजन,पोलिस पाटील दिनेश पाटील,विकोसो चेअरमन पन्नालाल पाटील,डॉ बी आर आंबेडकर अभ्यासिका अध्यक्ष प्रशांत सोनवणे,संचालक अमोल महाजन,सुरेंद्र महाजन,राजु पाटील,भैय्या पाटील,रज्जाक तडवी,डॉ.जावेद खान,मुक्तार अली,नासिर खान चोपडा माध्यमिक शिक्षकांची पतपेढी चे संचालक,धानोरा पत्रकार संघ,श्री समर्थ वासुदेवबाबा ग्राहक सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र यांनी अभिनंदन केले आहे.