एरंडोल येथे २ ते ३ एप्रिलदरम्यान राज्य स्तरीय साहित्य संमेलन
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । एरंडोल येथील औदुंबर साहित्य रसीक मंच’तर्फे राज्य स्तरीय साहित्य संमेलन २ ते ३ एप्रिल रोजी डि.डी.एस.पी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होत असल्याचे संमेलन स्वागताध्यक्ष अमित पाटील यांनी घोषित केले.
संमेलनाध्यक्ष म्हणून ८४व्या ठाणे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे, उद्घाटक म्हणून ८९व्या प्रिंप्रीचिंचवड येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधीतज्ञ ऍड. उज्वल निकम यांची उपस्थिती असणार आहे.
या संमेलनात कथाकथन , काव्यवाचन, परिसंवाद, आभिवाचन तसेच एक बहारदार अहिराणी भाषेतला कार्यक्रम अश्या भरगच्च कार्यक्रमाच्या मेजवानीचा लाभ मिळणार आहे. ” ती आणि मु” या.भंवरलाल जैन लिखित पुस्तकांवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन नियोजनासाठी घेण्यात आलेल्या सभेप्रंसगी अमित पाटील, विजय महाजन,अरुण माळी, औदुंबर साहित्य रसिक मंचाचे अध्यक्ष ऍड. मोहन शुक्ला, प्रा. वा.ना. आंधळे, सचिव विलास मोरे, पी.जी. चौधरी, बी.एन. चौधरी ( धरणगाव ), रवींद्र लाळगे, निंबा बडगुजर, प्रवीण महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.