यावल नगरपरीषद निवडणुकीत आठ जागा बिनविरोध

ऑक्टोबर 13, 2022 11:08 AM

binvirodh jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । यावल नगरपरीषद सेवकांच्या पतसंस्थेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. 11 पैकी आठ जागा बिनविरोध झाल्यानंतर तीन जागांसाठी निवडणूक झाली. यात अवघ्या एक व चार मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झाले विजयी उमेदवारांनी निकालानंतर जल्लोष केला.

यावल नगरपरीषद सेवकांची पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या संस्थेत 11 संचालक असून या 11 पैकी आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर महिला राखीव दोन जागांसाठी तिघांमध्ये तर अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी दोघांमध्ये लढत होती. यात अनुसूचित जातीच्या राखीव जागेवर मधुकर राजाराम गजरे यांनी दिनेश अशोक घारू यांचा केवळ एका मतांनी पराभव केला तर महिला राखीवच्या दोन जागांसाठी कल्पना बबलू घारू, रीतू संदीप तायडे व भारती राजेंद्र घारू यांच्या लढत होती.

यात अवघ्या चार मतांच्या फरकाने कल्पना घारू व पाच मतांनी रितू तायडे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत शेख अन्सार अहमद, रफिक अरब, संतोष नन्नवरे, असदुला खान, मुकेश गजरे, दादू धोत्रे, सुनील उंबरकर, रवींद्र काटकर हे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे एम.पी. देवरे, सहाय्यक म्हणुन एम.पी.भारंबे, आर.डी.राऊत, डी.जे.तडवी, एस.सी. पाटील आदींनी परीश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now