एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मागितली राज्यपालांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । शहर आगारातील बस संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य नाही. महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. तुटपुंजे वेतन व मानसिक त्रासामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यपालांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. राज्याचे प्रमुख म्हणून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर २००हून अधिक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन