⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

अमृत योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करा – महापौर जयश्री महाजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ७ एप्रिल २०२२ | शहर महानगरपालिकेत गेल्या अडीच वर्षापासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी संथ गतीने सुरू आहे. लवकरात लवकर अमृत योजनेचे काम पूर्ण करा असे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जळगाव शहरात गेल्या दोन वर्षांपासून अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची कामे होऊ शकत नाही येत. नागरिकांना रस्ते हवे आहेत. राज्य शासन देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देत आहे. अशावेळी अमृत योजनेचे न जोडणीचे काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असा आदेश यावेळी जयश्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

प्रत्येक घराला पाणी मिळायलाच हवं
अमृत योजनेतून जळगाव शहरातील प्रत्येक घराला पाळी हे मिळायलाच हवेत यासाठी यंत्रणा उभी करा आणि ज्या घरांना आतापर्यंत नळकनेक्शन मिळाले नाही येत त्या घरांना देखील नळकनेक्शन उपलब्ध करून द्या असे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी बैठकीत.

नवीन रस्ते पुन्हा फोडू नका
अमृत योजनेच्या कामांमध्ये काही त्रुटींमुळे पांडे डेअरी परिसरातले नवीन रस्ते पुन्हा सोडावे लागले होते ही चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेश यावेळी जयश्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.