धक्कादायक ! एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून केली चप्पल फेक

एप्रिल 8, 2022 4:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी मागील गेले अनेक महिन्यापासून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत दगडफेक आणि चप्पल फेक केली आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

ST employee throws slippers at Sharad Pawars residence

बुधवारी हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निकाल देताना सर्व कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. तर, सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतील असे म्हटले जात असताना आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात आक्रमक आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी निवासस्थान परिसरात घुसले.

विश्वास नांगरे पाटीलही आंदोलनस्थळी दाखल झालेत. आंदोलक कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र, शांतेत चर्चा करुयात असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी वारंवार केले. मात्र, त्यांच्या आवाहनाला आंदोलकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर हताश झालेल्या सुप्रिया सुळे पुन्हा घरात परतल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now