---Advertisement---
महाराष्ट्र शैक्षणिक

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर

student
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

student

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता नियमित लेखी परीक्षा होणार आहे.

---Advertisement---

दहावीची परीक्षा कधी?
बोर्डानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा बुधवारी 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी यासंदर्भात त्यांच्या शाळेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

बारावीची परीक्षा कधी ?
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या सर्वसाधारण अभ्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. या शिवाय बारावीच्या व्यवसाय अब्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

प्रात्याक्षिक परीक्षा कधी घेतली जाणार?
इयत्ता दहावीची प्रात्याक्षिक आणि तोंडी, श्रेणी परीक्षा 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेतली जाईल. दुसरीकडे बारावीची प्रात्याक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान घेतली जाईल.

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---