---Advertisement---
महाराष्ट्र शैक्षणिक

SSC, HSC Result 2022: ‘या’ तारखे पर्यंत लागणार दहावी, बारावीचे निकाल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज । ९ मे २०२२ । बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं असून आता परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल,” अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

ssc hsc result 2022

शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

---Advertisement---

यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या. राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

दरम्यान, मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या.

शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं. त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---