⁠ 
रविवार, मे 19, 2024

10वी, 12वी निकालाच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, जाणून घ्या निकालाची तारीख?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । राज्यात दहावी आणि बारावी परीक्षा (HSC Exam Result News) पार पडल्यानंतर निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. मागील काही दिवसापासून १० वी आणि १२ वी निकालाबाबतच्या तारखांबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात होते. मात्र याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

10 जूनपर्यंत बारावी निकाल जाहीर
बोर्डाच्या शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं होतं. त्यानुसार बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात, तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा

यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या. राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे विद्यार्थी,पालक काळजीत
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाचे विषयावार पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का असाही सवाल उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. परंत आता जून महिन्यात निकाल लागणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे.

या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील.
www.maharesult.nic.in

www.maharesult.nic.in

msbshse.co.in

hscresult.11thadmission.org.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in