10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी.. तब्बल 24,369 जागांसाठी सुरूय मेगाभरती, वेतन 69,100

SSC GD Constable Notification 2022 तुम्हीही दहावी पास असाल आणि तुम्हाला बीएसएफ, सीआयएसएफ किंवा सीआरपीएफमध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण  स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत विविध दलांमध्ये कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (SSC GD Constable Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. एकूण 24,369 कॉन्स्टेबल पदांची भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. म्हणून, लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरुन आपण नंतर येऊ शकणार्‍या तांत्रिक समस्या टाळू शकाल. SSC GD Constable Bharti 2022

कुठे किती रिक्त जागा
BBCF – १०,४९७ पदे
CISF- १० पदे
CRPF – ८,९११ पदे
SSB – १,२८४ पदे
ITBP – १६१३ पदे
आसाम रायफल्स – १६९७ पदे
SSF- १०३ पदे
NCB – १६४ पदे

अर्ज कसा करायचा
तुम्हाला BSF, CISF, SSB, ITBP, आसाम रायफल्स, SSF, NCB मध्ये सामील होण्यास स्वारस्य असल्यास, तुम्ही ssc.nic.in या SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.

कोण अर्ज करू शकतो
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, तुमचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २३ वर्षे असावे. जर वय यापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही.

पगार
वेगवेगळ्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी वेगवेगळे वेतन निश्चित करण्यात आले आहे. अनेक पदांवर 18,000 रुपये ते 56,900 रुपये वेतनश्रेणी दिली जातील. तसेच, इतर काही पदांवर, उमेदवारांचे वेतन 21,700 ते 69,100 रुपये असेल.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा