जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पदवीधरांसाठी केंद्रीय नोकरीची मिळवण्याची एक मोठी संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये उपनिरीक्षक पदांसाठी ही भरती होईल. SSC CPORecruitment 2023
या भरतीद्वारे तब्बल 1876 पदे भरली जातील. इच्छुक उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज 15 ऑगस्ट 2023 पर्यंत करता येणार आहे . अर्जातील दुरूस्तीची विंडो 16 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान उघडेल. संगणक आधारित परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये होणार आहे आणि तपशीलवार वेळापत्रक नंतर प्रसिद्ध केले जाईल. SSC CPO Bharti 2023
रिक्त पदाचे नाव :
1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 109
2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 53
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1714
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी.
अर्ज फी
अर्ज शुल्क रु. 100 आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
किती पगार मिळेल?
रु. 35400-112400/- (पे स्तर 6) (मूळ वेतनाव्यतिरिक्त, उमेदवारांना इतर भत्ते आणि फायदे देखील दिले जातात)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM)
भरतीची अधिसूचना पहा