जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ग्रॅज्युएट्स उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची उत्तम संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने संयुक्त पदवीधर स्तर (CGL) 2024 भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत एकूण 17,727 जागा भरल्या जातील. इच्छूकांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2024 आहे.अर्ज करण्यापूर्वी अनिवार्य शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया इत्यादींबद्दल तपशीलवार माहिती घेऊ. SSC CGL Bharti 2024
रिक्त पदाचे नाव :
1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3) इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4) इन्स्पेक्टर
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6) सब इंस्पेक्टर
7) एक्झिक्युटिव असिस्टंट
8) रिसर्च असिस्टंट
9) डिविजनल अकाउंटेंट
10) सब इंस्पेक्टर (CBI)
11) सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) ऑडिटर
14) अकाउंटेंट
15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) सिनियर एडमिन असिस्टंट
19) कर सहाय्यक
20) सब-इस्पेक्टर (NIA)
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा किती आहे?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३२ वर्षे असावे. तसेच सरकारी नियमानुसार SC/ST: 05 वर्षे सूट, तर OBC: 03 वर्षे सूट मिळेल
अर्ज शुल्क : जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये परीक्षा फी भरावी लागेल तर SC/ST/PWD/ExSM/महिला यांना फी नाही.
किती पगार मिळेल : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500/- ते 1,42,400/- पर्यंत पगार मिळेल(पदांनुसार पगार वेगवेगळा आहेत, कृपया जाहिरात पाहावी)
परीक्षेची तारीख काय आहे?
अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2024 आहे. अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी 10 ते 11 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात येणार आहे. टियर 1 परीक्षेची संभाव्य तारीख सप्टेंबर किंवा ऑक्टोबर आहे. टियर 2 परीक्षा आयोजित करण्याची संभाव्य तारीख डिसेंबर 2024 आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा