⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

SSC 10th Result 2022 : धाकधूक वाढली, उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, ‘जळगाव लाईव्ह न्यूज’वर पाहू शकता निकाल

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । गेल्या आठवड्यात १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याची मंडळातर्फे घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या दि.१७ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल जळगाव लाईव्ह न्यूजच्या वेबसाईटवर देखील पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल पाहण्यासाठी, सर्वप्रथम, विद्यार्थ्यांना MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्यावी लागेल. किंवा जळगाव लाईव्ह न्यूजच्या १० वी निकाल संदर्भातील कोणत्याही बातमीत देखील आपल्याला मंडळाच्या वेबसाईटची लिंक उपलब्ध होईल. मुख्यपृष्ठावर ‘महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 लिंक’ लिहिलेल्या अधिसूचना लिंकवर क्लिक करा. आता उमेदवारांना लॉगिन पृष्ठावर क्रेडेन्शियल प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर, MSBSHSE वर्ग 10 चा निकाल आपल्या समोर असेल

दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 14 लाख 49 हजार 660 विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या आठवड्यातचा बारावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल कधी लागणार याची चिंता लागून होती. बारावीला मुलींनी बाजी मारली असल्याने दहावीला देखील मुलींचाच डंका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.