गुन्हेजळगाव जिल्हा

नियंत्रण सुटल्याने भरधाव क्रुझर झाडावर धडकली : एक जण जागीच ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १८ ऑक्टोबर २०२२ । वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मजूरांना घेवून जाणारी क्रुझर झाडावर धडकल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. हा अपघात जळगाव तालुक्यातील विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून सोमवारी घडला. कांतीलाल हिरालाल पावरा (26, चांदसुरिया, पोस्ट वासूडी, ता. शिरपूर) असे मयत मजुराचे नाव आहे.

शिरपूर तालुक्यातील चांदसरीया, पोस्ट वासूडी येथील जगदीश जंगलू पावरा यांनी जळगाव एमआयडीसी परीसरात असलेल्या वेअर हाऊस कंपनीत ट्रक मधील गहू व तांदूळाचे पोते उतरविण्याचे ठेका घेतला असून या कामासाठी गावातील मजुरांना ते वाहनाद्वारे जळगावात आणतात. सोमवार, 17 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास सर्व मजूर गाडीत बसून जळगावकडे रवाना झाल्यानंतर विदगाव-ममुराबाद दरम्यानच्या रस्त्यावरून येत असतांना वाहनावरील चालक जगदीश पावरा याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन हे थेट झाडावर आदळले व नंतर बाजूच्या चारीत कोसळले.

चारीत वाहन कोसळताच मजूर कांतीलाल हिरालाल पावरा (26) याचा जागीच मृत्यू झाला तर रणजीत उर्फ राजा जयसिंग पावरा (24), गोकूळ वनासिंग भील (30), वांगर्‍या कालूसिंग पावरा (30) हे तिघे गंभीर जखमी झाले. तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे, साहेबराव पाटील, विलास शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचा भाऊ शांतीलाल हिरालाल पावरा याच्या माहितीवरून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली.

Related Articles

Back to top button