⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

उत्तर महाराष्ट्राच्या लेकीने ‘भारत जोडण्यासाठी त्यागली ‘एअर इंडिया’ची नोकरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो पदयात्रा सुरु आहे. नुकतीच हि यात्रा महाराष्ट्रात आली आहे. राहुल गांधी यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.याच भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आपल्या नोकरीवर पाणी सोडल्याची माहिती समोर आली आहे. आतिषा पैठणकर असे या तरुणीचे नाव आहे. आतिषा नाशिक रोडची रहिवासी आहे.

तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर आतिषाला एअर इंडियात नोकरी मिळाली. होती . ७ सप्टेंबरला तिच्या नोकरीत रुजू व्हायचं होत. मात्र नेमक्या त्याच दिवशी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होणार होती. नोकरीवर रुजू होण्यासाठी ती ६ सप्टेंबरला कोलकाताला जायला निघाली पण ती द्विधा मन:स्थितीत होती. मुंबई विमानतळावर आल्यावरही आतिषाला नोकरी की भारत जोडो या प्रश्नामुळे अस्वस्थ होती. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे भारत जोडो यात्रेचा आज सहावा दिवस आहे. राजकीय नेत्यांसह डॉक्टर, इंजिनिअर, वकील, खेळाडू देखील या यात्रेत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली.