⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | विशेष रेल्वेगाड्या पूर्ववत धावणार

विशेष रेल्वेगाड्या पूर्ववत धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । रेल्वे गाड्यांना प्रवासी संख्या वाढल्याने रेल्वे विभागाने बंद केलेल्या काही विशेष रेल्वेगाड्या आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 02112 अमरावती -मुंबई विशेष गाडी 1 जुलै तर 02111 मुंबई अमरावती विशेष 2 जुलैपासून पुर्ववत धावेल. 01137 नागपुर-अहमदाबाद विशेष दर बुधवारी 7 जूलैपासून तर 01138 अहमदबाद-नागपुर स्पेशल 8 जूलैपासून दर गुरुवारी धावेल. 01403 नागपुर -कोल्हापुर विशेष मंगळवार व शनिवारी 3 जूलैपासून आणि 01404 कोल्हापुर-नागपुर विशेषगाडी सोमवार व शुक्रवारी 2 जुलैपासून पूर्ववत धावेल.

01131 दादर-साई नगर शिर्डी विशेष 3 जूलै, तर 01132 साई नगर शिर्डी-दादर विशेष 4 जूलैपासून, 02147 दादर-साई नगर शिर्डी विशेष गाडी दर शुक्रवारी 2 जूलैपासून आणि 02148 साई नगर शिर्डी-दादर विशेष दर शनिवारी 3 जूलैपासून पूर्ववत धावेल. 02035 पुणे -नागपुर विशेष गाडी 4 जूलै पासून 02036 नागपुर -पुणे विशेष 3 जूलैपासून, 02113 पुणे-नागपुर विशेष 3 जूलै तर02114 नागपुर -पुणे विशेष 2 जूलैपासून पूर्ववत धावेल. 02117 पुणे-अमरावती एसीविशेष दर बुधवारी 7 जूलैपासून तर 02118 अमरावती-पुणे एसी विशेष दर गूरुवारी 8 जूलैपासून पूर्ववत होईल. या सर्व गाड्यांमध्ये मात्र आरक्षीत तिकिटावर प्रवास करता येईल. वेटींग किंवा जनरल टिकिटावर प्रवास बंदच राहिल.

पुणे-अजनी दोन विशेष गाड्या पूर्ववत

02223 पुणे -अजनी विशेष दर शुक्रवारी 10 जुलैपासून तर 02224 अजनी -पुणे विशेष दर मंगळवारी 6 जूलैपासून, 02041 पुणे-नागपुर स्पेशल दर गुरुवारी 1 जूलैपासून आणि 02042 नागपुर -पुणे दर शुक्रवारी 2 जुलैपासून, 02239 पुणे -अजनी विशेष दर शनिवारी 3 जुलैपासून तर 02240 अजनी -पुणे विशेष दर रविवारी 4 जुलैपासून पूर्ववत सुरू होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.