जळगाव जिल्ह्यात नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदी सुरु

ऑक्टोबर 29, 2024 5:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावात केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीनची खरेदी सुरु झाली आहे. खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये जळगाव जिल्ह्यात नाफेडच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर पासून सोयाबीनची खरेदी सुरु झालेली आहे.

Soyabin jpg webp

सोयाबीन खरेदीचा कालावधी हा १५ ऑक्टोबर ते १२ जानेवारी पर्यंत आहे. सोयाबीन शेतमाल विक्रीसाठी आणण्यापुर्वी आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर सोयाबीनचे नमुने घेवून जाऊन मॉईश्चर १२% पेक्षा कमी आर्द्रता असलेला सोयाबीनच विक्रीसाठी आणावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरुन माल परत घेवून जावा लागणार नाही. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी केले आहे.

दरम्यान मागील काही दिवसापासून सोयाबीन दरात किंचित चढ उतार दिसून आला. सध्या जळगावात सोयाबीन दरात किंचित वाढ झालेली दिसून येत असून प्रति क्विंटल ३९०० ते ४४०० रुपयापर्यंतचा दर सोयाबीनला मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now