जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाला “ब”वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून मी कटिबद्ध आहे देवस्थानच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र ग्राम विकास अथवा पर्यटन यातून किमान पाच कोटी रुपयांच्या निधी मिळवुन देणार अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिली.

एरंडोल तालुक्यातील मुगपाट (पद्मालय) येथे गालापूर मुगपाट ग्रुप ग्रामपंचायत तर्फे अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचा आधी मंत्री महोदयांनी उपस्थित मान्यवरांसह श्री गणेशाचे दर्शन घेतले देवस्थानचे विश्वस्त पुजारी व भाविकांनी त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील हे होते, प्रमुख अतिथी म्हणून शेतकी संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव चव्हाण, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे ,वरखेडीचे सरपंच संतोष पाटील ,पिंप्री चे बबन पाटील, आनंद नगरचे गजानन राठोड, मालखेड येथे माजी सरपंच मुकुंदा पाटील ,बाळा पाटील, पांडुरंग पाटील,विजय माळी ,अशोक पाटील ,शांताराम पाटील, ताडेचे सरपंच सचिन पाटील, चंद्रभान पाटील, बबलू पाटील, शरद ठाकूर आदी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात विविध विकास कामांना गती आली असल्याचे स्पष्ट केले. नामदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यभरात सर्वच ठिकाणी पाणीपुरवठा योजना गती मिळाली असल्याचे नमूद केले. यात नवीन निकषांच्या माध्यमातून वाढीव पाणी मिळणार आहे. पाणीपुरवठा खात्याच्या तत्पर कामाचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी कौतुक केले आहे भविष्यात देखील याच प्रकारे गतिमान कामे होत राहतील अशी ग्वाही मंत्री पाटील दिली.
प्रास्ताविक गालापुरचे माजी सरपंच आरिफ शेख यांनी केले सूत्रसंचालन ग्रामसेवक रमेश पवार यांनी केले तर गालापूरचे सरपंच विनोद महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.