जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसात जळगाव शहरात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहे. यात अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. अशातच जळगावात सासरी कामानिमित्त दुचाकीने आलेल्या जावयाचा १५ जुलै रोजी रात्री १०.३० अपघात. यात गंभीर जखमी झालेल्या जावयाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. सागर रामचंद्र सुर्यवंशी (वय ३२ रा. रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून याबाबत याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे सागर सुर्यवंशी हे आपल्या आईवडील, पत्नी, दोन मुलं, भाऊ यांच्यासह वास्तव्याला होते. ते सोमवारी १४ जुलै रोजी ते जळगावातील दशरथ नगरातील सासरी कामानिमित्त दुचाकीने आलेले होते. मंगळवारी १५ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता सागर सुर्यवंशी हे दुचाकीने प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूल जवळून जात असतांना स्पिड ब्रेकरवर त्यांची दुचाकी आदळली गेली. त्यात ते जमीनीवर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आज बुधवारी १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी होती. प्राथमिक तपास पोहेकॉ भरत लिंगायत करीत आहे









