⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

सोलापूर विभागातील ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द ; या गाड्यांच्या मार्गात बदल

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । सोलापूर रेल्वे विभागातील बेलापुर, चितळी आणि पुंतांबा स्टेशन, दौंड- मानमाड सेक्शन दरम्यान नॉन इंटरलॉक, दुहेरीकरण NI ब्लॉक काम सुरू आहे. आजपासून (ता. 25 मार्च) 30 मार्चपर्यंत ट्राफिक ब्लॉक असणार असून यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यात भुसावळून धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.

चार दिवस ट्राफिक ब्लॉक चालू असल्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. यात गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्रात एक्स्प्रेससह पुणे नागपूर गाडीचा समावेश आहे. महाराष्ट्रात एक्स्प्रेस २८, २९, ३० मार्चला रद्द करण्यात आलेली आहे.

या गाड्या रद्द
दौंड निजामाबाद एक्सप्रेस, निजामाबाद पुणे एक्सप्रेस, नांदेड पुणे एक्सप्रेस, हडपसर नांदेड एक्सप्रेस, कोल्हापूर गोंदिया एक्सप्रेस, नागपूर पुणे या गाड्या रद्द करण्यात आले आहे. याची प्रवाशांनी नाेंद घ्यावी असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

या गाड्यांच्या मार्गात बदल
दरम्यान बेंगलोर न्यू दिल्ली सुपरफास्ट, एक्सप्रेस हावडा पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, पुणे वाराणसी एक्सप्रेस, यशवंतपुर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. तर इतर रेल्वे (एक्सप्रेसच्या) गाड्या हा परावर्तित करण्यात आल्यात आहेत.