आम्हाला बदनाम करण्यासाठी काही लोक सोडण्यात आले आहेत – मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । खोके अर्थात पैसे घेतल्याचे आरोप करण्यासाठी, आम्हाला बदनाम करण्यासाठी काही लोक आमच्यावर सोडण्यात आले आहेत, असा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. “बदनाम जो होते है जो बदनामी से डरते है हम तो व बदनाम है बदनामी हमसे डरती है.” असे गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी ते एका सभेत बोलत होते.
तीन-चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) इकडे आलेले लोक आमच्यावर टीका करत आहेत. असे गुलाबराव पाटील म्हणाले. याच बरोबर पाण्यामध्ये राजकारण न करता काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना व उद्धव ठाकरेवाले सर्वांनी पाणी प्या आणि मैदानात या…. पाण्यात जात धर्म पंथ पाहायचा नसतो हे कोरोना काळात सर्वांनी अनुभवला आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले.
पाण्याच्या कामात इमानदारी पाहिजे मात्र आजच्या काळात प्राथमिक शिक्षक व मिल्ट्री मधला माणूस हेच इमानदार आहेत बाकी माझ्यासह कुणीही इमानदार नसून सद्यस्थितीत शिट्टी मारली की पैसे, आजा मेरी गाडी मे बैठ जा… अशी परिस्थिती असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.