जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

मार्च 28, 2022 5:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रशासकीय कारणास्तव जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात दोन बदल्या विनंतीवरून तर दोन बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या आहेत.

police

या निरीक्षकांच्या बदल्या
पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर जळगाव जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांची पारोळा पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली. जळगाव नियंत्रण कक्षातील राहुल सोमनाथ खताळ यांची धरणगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर धरणगावचे शंकर विठ्ठल शेळके यांची मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

मुक्ताईनगरला नूतन निरीक्षक रूजू

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now