
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी आधुनिक विचार मांडताना तो समाजात रुजवण्यासाठी हळुवारपणा ठेवला. तो संयम चळवळीत काम करणाऱ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. महापुरुषांना जाती-पातीमध्ये न अडकवून ठेवता त्यांच्या आधुनिक व विज्ञाननिष्ठ विचारांची प्रेरणा समाजाने स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.अशोक राणा यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ११ ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यात अाला. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी ‘पुरोगामी चळवळीच्या दृष्टिकोनातून विकसनशील भारत’ या विषयावर डॉ. अशोक राणा यांनी विचार मांडले. व्यासपीठावर कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, प्रा. म. सु. पगारे, प्रा. अनिल डोंगरे उपस्थित होते. डॉ. राणा पुढे म्हणाले की, विविध पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकमेकांप्रती सहकार्याची भावना ठेवल्यास चळवळींना यश येऊन देशात समता व बंधुता नांदेल असे सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. दीपक खरात यांनी केले. प्रा.पगारे यांनी आभार मानले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यापीठात सकाळी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रा. म. सु. पगारे, प्रा. जे. बी. नाईक, प्रा. दीपक दलाल, एस.आर. गोहिल, प्रा.राकेश रामटेके, प्रा.किशोर पवार, प्रा. रमेश सरदार, अजमल जाधव, राजू सोनवणे, मनोज वराडे, जगदीश सुरळकर, संजय सपकाळे, अरुण सपकाळे, जयंत सोनवणे, भीमराव तायडे, भय्या पाटील, दुर्योधन साळुंखे, अमृत दाभाडे, वैशाली वराडे, अशेाक पाटील उपस्थित होते.
.








