⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे 7 रोजी अमळनेरात

सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे 7 रोजी अमळनेरात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे हे शनिवार दि 7 मे रोजी अमळनेर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत सकाळी 9.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. 

          यानंतर ना मुंडे यांच्या उपस्थितीतच अमळनेर मतदारसंघातील इंधवे ता.पारोळा येथे सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संवाद मेळावा होणार आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सारे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अथक प्रयत्नातून राष्ट्रवादी च्या या भव्य कार्यालयाचे निर्माण धुळे रोडवरील सिद्धीविनायक कॉलनीत झाले आहे.

सदर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री एकनाथरावजी खडसे,माजी खासदार ईश्वरलाल  जैन,माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरूणभाई गुजराथी,माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकरचेअरमन,माजी मंत्री  डॉ.सतीश पाटील,राष्ट्रवादी चे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र भैय्या पाटील,माजी खासदार वसंतराव मोरे,माजी आमदार गुरुमुख जगवाणी,माजी आ मनीष जैन,माजी आ राजीव देशमुख, चाळीसगाव,माजी.आ कृषिभूषण साहेबराव पाटील,पाचोऱ्याचे माजी आ दिलीप वाघ,चोपडा येथील माजी आ कैलास पाटील,रावेरचे माजी आ अरुण पाटील,माजी आमदार दिलीप सोनवणे,भुसावळचे माजी आमंदार संतोष चौधरी,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस हाजी एजाज ,शेंदुरणी येथील संजय गरुड,जिल्हा कॉटन फेडरेशन चे चेअरमन संजय पवार,जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष सौ. रोहिणीताई खडसे,राष्ट्रवादी च्या महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी,राष्ट्रवादी चे प्रवक्ते योगेश देसले,युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,महाराष्ट्र ग्रंथालय समितीच्या सदस्या सौ. रिताताई बाविस्कर,राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी सौ.तिलोत्तमाताई पाटील, शिवाजीराव पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्षअरविंद मानकरी,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

.तरी उदघाटन सोहळा व संवाद मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील,पारोळा प स च्या माजी सभापती छायाबाई जितेंद्र पाटील,माजी सभापती प्रकाश जाधव,जि प सदस्य हिंमत वामन पाटील,पारोळा प स चे माजी उपसभापती अशोक नगराज पाटील,चंद्रकांत दामोदर पाटील,एस टी महामंडळाचे कामगार नेते एल टी पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील,विनोद कदम,महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी पाटील,महिला शहराध्यक्ष अलका पवार,अमळनेर प स सदस्य प्रविण वसंतराव पाटील, निवृत्ती पुंजू बागुल,विनोद जाधव,युवक तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे,युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनिल शिंपी यांनी केले आहे.
कार्यालय देणार राष्ट्रवादीला बळकटी


       विद्यमान आमंदार अनिल भाईदास पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश त्यानंतर जि. प. व प. स. निवडणूकित झालेली पक्षाची सरशी त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि पक्षाचा वाढलेला विस्तार व आता आमदार अनिल पाटील यांच्याच प्रयत्नाने निर्माण झालेले राष्ट्रवादी चे भव्य असे कार्यालय यामुळे अमळनेर मतदारसंघात निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार असून सदर कार्यालयामुळे कार्यकर्ते आणि जनतेचा पक्षाशी आणि आमदारांशी संपर्क अधिक वाढणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह