⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | ..म्हणून तरुणाने तहसील कार्यालयासमोर रचली स्वतःची चिता!

..म्हणून तरुणाने तहसील कार्यालयासमोर रचली स्वतःची चिता! 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bodawad News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । बोदवड येथील तहसीलदाराचे पद रिक्त असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. वारंवार मागणी करूनही तहसीलदारांची नियुक्ती होत नसल्याच्या निषेधार्थ येवती येथील तरुणाने आज सरणावर झोपून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. या आंदोलनाची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झालीय.

प्रमोद धामोडे या तरुणांनी हे आमरण उपोषण सुरु केले आहे. धामोडे यांनी याआधी निवेदन देऊन मागणी केली होती की, ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसिल कार्यालयामध्ये काम असते. सदरचे काम करीत असतांना पुर्णवेळ तहसिलदार नसल्यामुळे वृद्ध, अपंग व निराधार नागरीकांना तसेच पुरवठा शाखेमध्ये विविध कामांसाठी, पंतप्रधान सन्मान योजने संदर्भात तक्रार करण्यासाठी तहसिलदार नसल्यामुळे बोदवड तालुक्यांतील नागरीकांचे नुकसान होत आहे.

याबाबत बऱ्याच वेळा विविध पक्षामार्फत तसेच संघटनांमार्फत निवेदने देण्यात आली आहेत. परंतू त्याबाबत वरीष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेवून कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आपण आज पासून बोदवड तहसिल कार्यालय या ठिकाणी पूर्णवेळ तहसिलदार यांची नियुक्ती व्हावी, या मागणीसाठी सरणावर झोपून आमरण उपोषणाला प्रारंभ केल्याचे प्रमोद धामोडे यांनी सांगितले. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने हे उपोषण धामोडे यांन करावे, लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह