---Advertisement---
जळगाव जिल्हा

..तर समाजकंटकांची खैर नाही : डॉ.प्रवीण मुंढे

---Advertisement---

आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षकांच्या सूचना

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । आगामी काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, महावीर जयंती, हनुमान जयंती, रमजान ईद असे सणोत्सव येणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. समाजकंटकांना पोलिसांनी इशाराच दिला असून जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

sp jalgaon pravin mundhe jpg webp

जळगावात १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ६४६ मिरवणूका, १४७ पुतळा पूजन, ६०० प्रतिमा पूजन, १० दुचाकी रॅली, ४ व्याख्यान, १ भीम गीत कार्यक्रम असे संभाव्य कार्यक्रम होणार आहेत. दि.१५ ते ३० एप्रिल दरम्यान २५० मिरवणूक आहेत. सर्व सणोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे तब्बल अडीच हजार पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच एक सीआरसीपी प्लाटून देखील लक्ष ठेवून असणार आहे.

---Advertisement---

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे म्हणाले, जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जातीय तेढ निर्माण करणारे संदेश पसरविले जात आहे. एकाच जातीच्या व्यक्तीकडून खरेदी करू नका, विशिष्ट समाजाला त्रास देण्यासाठी लोडशेडिंग केले जात असल्याची माहिती पसरवत समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात असे काही प्रकार लक्षात आल्यास नागरिकांनी निनावी तक्रार करावी, असे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले आहे. अमळनेर येथे एकावर कारवाई देखील करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सणोत्सव काळात ध्वनी प्रदूषण केल्यास देखील गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयाने निश्चित करून दिलेली ध्वनीची डेसीबल मात्रा ओलांडली तर कारवाई होणार आहे. लोडशेडींगला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, सणोत्सव काळात वीज पुरवठा खंडित करू नये यासाठी आमचा देखील प्रयत्न असेल असेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

पहा व्हिडीओ प्रक्षेपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/334689005327777

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---