⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

..म्हणून सत्यजीत तांबे भाजपात प्रवेश करणार नाही!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांचा अपक्ष म्हणून विजय झाला आहे. तर दुसरीकडे ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा रंगू लागली आहे. अश्यावेळी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी तांबे यांच्या भाजप प्रवेशावर विधान केले होते.

यावेळी केसरकर म्हणाले कि, सत्यजीत तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय निश्चित आहे. मात्र, ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. कारण, तांबे हे कुठल्या पक्षात गेलेले नाहीत. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केला आहे ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही विधानपरिषदेत अपक्ष म्हणून राहता, त्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ शकत नाहीत. तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता. असे केसरकर म्हणाले होते.

सत्यजीत तांबे यांनी भाजपप्रवेशावर भाष्य करताना माझी उमेदवारी ही कॉग्रेसची उमेदवारी आहे. माध्यमांनी चुकीची माहीती दिलीय. मी कॉग्रेस फॉर्म भरला मात्र तिन वाजेपर्यंत एबी फॉर्म भरू शकलो नाही त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. जे सत्य आहे ते योग्य वेळ आली की सांगेल. असं म्हटलं होतं. तसेच नाना पटोले यांनी अर्धसत्य सांगितलं मी लवकरच योग्य वेळ आली की पूर्णसत्य सांगेल. राजकारणाची योग्य वेळ कधीही येवू शकते असंही सत्यजीत तांबे यांनी म्हंटले आहे.