महाराष्ट्रराजकारण

..तर मी घरात बसेन – राज ठाकरे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. मनसेच्या पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर असल्याचं दिसत आहे. त्यात त्यांनी प्रामुख्याने कोकणावर लक्ष केंद्रित केलं आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “आपण आपला विचार लोकांपर्यंत का पोहचवायचं म्हणत आहोत. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी पदानुसार बोलण्यापेक्षा मनाने एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. आज चिपळूणमध्ये शाखेचं उद्घाटन झालं. इथे अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी येऊन गेली. जोरदार कामाला सुरुवात झाली आहे.”

“एखाद्या पदावर बसल्यावर काम झालं पाहिजे. पक्ष सांगेल ते काम करावं लागेल, अन्यथा पदावर राहता येणार नाही. मला तडजोड करावी लागली, तर मी घरात बसेन, तडजोड करणार नाही. राज्यात जो व्यभिचार सुरू आहे, तो मी करणार नाही,” असं महत्त्वाचं विधान राज ठाकरेंनी केलं.

Related Articles

Back to top button