⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वादळ पावसाचा मारा बसलेल्या शेकडो पोपटांचा सर्पमित्रांनी वाचवला जीव…

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । राज्यासह जिल्ह्यात अनेक भागाला मान्सून पर्व पावसाच्या वादळी वाऱ्याने झोडपून काढेल आहे. दि. ९ रोजी वरणगाव फेक्ट्रीत रात्र निवारा म्हणून निलगिरी च्या झाडांवर बसलेल्या शेकडो पोपटांवर काळाचा घाला बसला. वादळी पावसात निलगिरी च्या झाडांच्या फांद्या तुटल्या त्यात वादळ पावसाचा मारा बसून शेकडो पोपट जखमी झाले, तर काही पोपट ठार झाले. दरम्यान, याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र निशांत रामटेके यांना मिळाली त्यांनी संस्थेच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत तब्बल 350 पोपटांचा जीव वाचवला. दरम्यान, निशांत रामटेके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

या अचानक आलेल्या वादळी पावसाच्या माऱ्याने ओले होऊन पाऊस पडावा तसे एक एक करत शेकडो पोपट झाडावरून पडू लागले. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधला. संस्थेचे सर्पमित्र निशांत रामटेके यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले शेकडो पोपट मृत्युमुखी पडले होते तर तितकेच जखमी, ओले होऊन विव्हळत पडले होते. सर्पमित्र निशांत रामटेके, स्वप्नील सुरवाडे, भूषण कोळी, लखन लोहारे, अक्षय तेली, मनीष कोळी, सागर कोळी सहकारी मित्र- राहुल कोळी, हर्षल कोळी, प्रतीक मेढे,दिरज सुरवाडे, आकाश सोनार, अनिकेत वांकेडे, कुणाल गुरचड, ललित, लखन रांसिंगे, मनोज अंबोडे, राहुल खरात, ओम शिंदे आदी सहकाऱ्यांनी तातडीने पोपटांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरवात केली. सोबत 2 पिंजरे होते त्यात काही पक्षांना ठेवले परीसरातील एका रूम मध्ये पोपटांना एकांतात सोडून खिडकी दार उघडे ठेवण्यात आले. बाहेरून मांजर किंवा कुत्रा आत येणार नाही याची काळजी घेण्यात आली. तासाभरात ट्रेस कमी झाल्याने पोपटांत धीर आला आणि सुमारे 30 ते 40 पोपटांनी आकाशात भरारी घेतली, उर्वरित पोपटांना रात्री त्याच रूम मध्ये ठेवन्याचा निर्णय घेत संस्थेचे पक्षीमित्र वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो चे बाळकृष्ण देवरे यांना संपर्क साधला त्यांचे मार्गदर्शन घेत सकाळी गरज भासल्यास पशुवैद्यकीय अधिकारी मार्फत उपचार करून पोपटांना मुक्त करण्याबाबत चर्चा करत सर्पमित्र घरी आले. दरम्यान निशांत रामटेके आणि माजी उपाध्यक्ष सतीश कांबळे यांनी वनविभागास माहिती दिली पक्षांना सकाळी लवकर सोडण्या बाबत चर्चा झाली.

रूम मध्ये एकांत असल्याने रात्रीच्या शांत वातावरणात ट्रेस कमी झाल्याने त्यातील सगळे पोपट एकदम सुस्थितीत आले बहुसंख्य पोपटांना उपचाराची गरज भासली नाही. सकाळी वनकर्मचारी वनपाल दिपश्री जाधव, वनरक्षक सुनील चिंचोले, वनरक्षक खांडरे, वनरक्षक वानखेडे, डॉ. एसएन कोल्हे दाखल झाले.
सुरक्षित स्थळी जाऊन पिंजरे खोलताच सर्व पोपट एक एक करत आकाशात भरारी घेत होते ते बघून वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनकर्मचारी बांधवांनी आनंद व्यक्त केला. 7 पोपट किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करून निसर्गात मुक्त केले जाईल असे निशांत रामटेके यांनी सांगितले.
वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, सतीश कांबळे, रवींद्र सोनवणे, राहुल सोनवणे, योगेश गालफाडे, यांनी निशांत रामटेके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले

निलगिरी च्या झाडांवर पोपट ढोली करून अधिवास करत नाहीत मात्र घरट्यात अंडी उबवणार्या माद्या व्यतिरिक्त सर्व पोपट रात्र निवारा म्हणू परिसरातील झाडांवर आश्रय घेतात यात निलगिरी सारखे परदेशी वृक्ष हे विरळ पर्णसांभार असल्याने त्यावर बसलेल्या पक्षांना वादळी पावसाचा फटका जोरात बसला ओले झाल्यावर बसण्यासाठी योग्य जागा न मिळाल्याने पक्षी अक्षरशः बारीक फांद्यांना लटकून जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले ही दुःखद घटना असून सर्पमित्रांनी वेळीच धाव घेत असंख्य पक्षांचा जीव वाचवला हे कौतुकास्पद कार्य असल्याची भावना बाळकृष्ण देवरे यांनी व्यक्त केली.

नागरिकांनी काही पोपट पळवून नेले… परंतु

काही नागरिकांनी 20 ते 25 पोपट पाळण्यासाठी पोपट पळवून नेले. त्या नागरिकांचा शोध घेऊन ते पोपट निशांत रामटेके यांनी ताब्यात घेत, लगेच निसर्गात मुक्त केले अजून काही लोकांकडे पोपट असल्याची माहिती मिळाली, ते वनविभागाच्या सहकार्याने ताब्यात घेऊन मुक्त करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारे वन्यजीव, पक्षी पाळणे पिंजऱ्यात कैद करून ठेवणे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कायद्याने गुन्हा आहे. अश्या लोकांना कारावास आणि 10 हजार रु. दंड होऊ शकतो तरी ज्या नागरिकांनी पोपट घरी नेले आहेत त्यांनी तात्काळ वनविभागाकडे जमा करावे – रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक , महाराष्ट्र वनविभाग

मृत्यू पक्षांचे अंत्यसंस्कार…

रस्त्यावरील मृत पक्षी कुत्रे, मांजरानी रात्रीत उचलून नेले. बाकी झाडांच्या पालापाचोळ्यात पडलेले मृत पक्षी एकत्र करून पंचनामा करत त्यांचे अंतिमसंस्कार करण्यात आले.