⁠ 
शनिवार, मे 4, 2024

दिलासादायक! टोमॅटोचे गगनाला भिडलेले दर घसरले; ‘असे’ आहेत भाव

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। टोमॅटोचे गगनाला भिडलेले दर घसरले आहेत. त्यामुळे २०० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता स्वस्त होणार आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये सध्या आवक सर्वसाधारण होत असल्याने १०० रुपये प्रतीकिलोने टोमॅटो विकले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

देशात टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली होती. त्यामुळे स्वयंपाकघरात दररोज वापरण्यात येणारा टोमॅटो विकत घेणं सर्वसामान्यांना जवळपास अशक्य झालं होतं. अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव १६० ते २०० रुपये किलोवर पोहोचल्याने गृहिणींच्या घरचे बजेट बिघडले होते. रोजच्या जेवणात वापरला जाणाऱ्या टोमॅटोची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली. त्यामुळे अनेकांच्या भाजीतील टोमॅटो गायब झालेला पाहायला मिळाला.

सर्वसामान्य व्यक्तीची ते एक किलो टोमॅटो खरेदी करत होते, तिथे पाव किलो टोमॅटो खरेदी करू लागले. काही दिवस हाच टोमॅटो एक किलोला दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत होते. मात्र, सध्या एक किलो टोमॅटो साठी १०० ते १२० रुपये मोजावे लागत आहे. चांगल्या क्वालिटीचा टोमॅटो घेताना शंभर किंवा १२० रुपये मोजावे लागतात. तर असेल त्यानुसार त्याला भाव मिळत असलेला सध्या पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक ही सर्वसाधारण आहे. मात्र, टोमॅटोची भाव हे कमी जास्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी दीडशे ते दोनशे रुपये किलो विकला जाणारा टोमॅटो सध्या १०० रुपये किलोने विकला जात आहे. मात्र, अजूनही सर्वसामान्यांना टोमॅटो खरेदी करणे परवडत नाही. खूप दिवसांनी टोमॅटोच्या दरात काहीशी घसरण झालेली आहे. त्यामुळे खेरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पंधरा ते वीस दिवसांनी टोमॅटोचे दर आणखी घसरणार असल्याचे व्यापाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.

१५० ते २०० रुपये किलोवर पोहचलेले टोमॅटो आता एपीएमसी बाजारात चांगल्या प्रतीचे टोमॅटो १०० ते १२० रुपये किलोने विकले जात आहेत. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये सातारा सांगलीवरून टोमॅटोची आवक सर्वात जास्त असून सांगली वरून येणाऱ्या टोमॅटोला ग्राहक पसंती देत आहेत. येणाऱ्या १५ दिवसांनंतर ते एक महिन्यामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये जास्त प्रमाणात घसरण होईल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.त्यामुळे काहीसा दिलासा ग्राहकांना मिळाल्याचे दिसत आहे.

रत्नागिरी – १००-११० रुपये प्रति किलो
धुळे – १६० ते १८० रुपये प्रति किलो
नाशिक – ८० ते १०० रुपये प्रति किलो
पुणे – १६५ रुपये प्रति किलो