गुन्हेजळगाव जिल्हा

भुसावळात सापडला तरुणाचा सांगाडा : दारू प्यायल्यावर मित्रांनीच केला दगडाने ठेचून खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । भुसावळ शहरातील रामदेव बाबा नगरातील रोहित दिलीप कोपरेकर (वय-२१) या तरुणाचा खून करून शेतात मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. दरम्यान, खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर जळगाव एलसीबी आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने तपास करीत दोन्ही संशयितांना अटक केली आहे. काही दिवसापूर्वी रोहितच्या संपर्कात आलेल्या दोन मित्रांनीच दारू प्यायल्यावर त्याची दगडाने ठेचुन हत्त्या केल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भुसावळ शहरातील रोहित कोपरकर हा तरुण दि.३० मे रोजी हॉटेलमध्ये कामाला जायचे असल्याचे सांगून दुचाकी क्रमांक एम.एच.१९. डी.पी.२४२३ ने बाहेर पडला होता मात्र तीन दिवस उलटूनही घरी न परतल्याने तो हरवल्याबाबत दि.२ जून रोजी बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली होती तर रविवार दि.५ रोजी वांजोळा शिवारातील मिरगव्हाण रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामागे रोहितचा खून करून मृतदेह फेकण्यात आल्याचे आढळून आले होते. पाच दिवस उलटल्याने मृतदेहाच्या वरील भागाचा केवळ सांगडा शिल्लक राहिला होता मात्र चप्पल, पँट आदी वर्णनावरून मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवल्यानंतर घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले व त्यात मृताच्या डोक्यात दगड टाकण्यात आल्याची बाब उघड झाली होती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खुनाचा गुन्हा दाखल होताच एलसीबीच्या पथकाने आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने लागलीच तपासचक्रे फिरविण्यास सुरूवात केली होती. मयत रोहितच्या संपर्कात असलेल्या मित्रांसह त्याच्या मोबाईलवर आलेल्या क्रमांकाच्या आधारावर पोलिसांकडून काही संशयितांची नावे निष्पन्न केली होती. घटनेच्या दिवशीची हॉटेलमधील व्हिडीओ पाहिले असता तो दोन मित्रांसोबत बाहेर जाताना दिसून आला होता.

जुना सातारा भागातील स्वच्छतागृहाजवळ पांढर्‍या रंगाची बेवारस दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी इंजिन व चेसीस क्रमांकावरून तपास केल्यानंतर ही दुचाकी क्रमांक एम.एच.19 डी.पी.2423 मयत रोहितची असल्याचे स्पष्ट झाले तर मयताच्या कुटुंबियांनीही दुचाकीची ओळख पटवली आहे मात्र संशयीत आरोपींनी दुचाकीवर लिहिलेली महाकाल व आई ही नावे हटवली असलीत री स्टीकरचा काही भाग तसाच राहिल्याने रोहितचीच ती दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले होते.

एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सागर दगडू पाटील
डोंबिवली, मुंबई येथून अटक केली होती. तसेच दुसरा संशयित राहुल नेहते याला देखील पथकाने बुधवारी अटक केली. संपूर्ण तपासात एलसीबीच्या पथकासह भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने मेहनत घेतली

Related Articles

Back to top button