सर्पदंशाने सहा वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; जामनेरातील दुर्दैवी घटना

फेब्रुवारी 25, 2026 9:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील सहा वर्षीय बालिकेचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. आलिया फिरोज तडवी असे मृत बालिकेचे नाव असून वडिलांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी मोठी धावपळ केली मात्र ती व्यर्थ ठरली.

snakebite jpg webp

पिंपळगाव बुद्रुक येथे नदीकाठी अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी फिरोज तडवी हे पत्नी एक मुलगा व दोन मुलीसह राहतात. मंगळवारी दुपारी दीड वाजे सुमारास बहिण, भाऊ खेळत असताना सहा वर्षीय आलियाला सर्पदंश झाला. तिने आरडाओरड करून वडिलांना साप चावल्याचे सांगितले. वडील फिरोज तडवी यांनी सापाचा शोध घेतला मात्र साप दिसला नाही.

वेळ न घालवता फिरोज तडवी यांनी मुलीला मोटारसायकल वरून तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्या ठिकाणी प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांनी जळगावला नेण्याचा सल्ला दिला. मात्र अलियाला घेऊन जात असताना रस्त्यातच आलीयाची प्राणज्योत मावली.

जळगाव येथील दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी अलियाला मृत घोषित केले. या घटनेमुळे पिंपळगाव बुद्रुक परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी ग्रामीण भागात सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now