प्रवाशांनो लक्ष द्या! जानेवारीत जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या सहा एक्स्प्रेस उशिराने धावणार

डिसेंबर 9, 2025 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पुढील महिन्यात म्हणजे जानेवारीत जर तुम्ही भुसावळ, जळगाव मार्गे पुण्याला रेल्वेनं प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणेज मध्य रेल्वेने नवीन वर्षाच्या सुरूवातीला दौंड आणि मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम हाती घेतले आहे.

train

त्यामुळे ४ ते २५ जानेवारीदरम्यान अमरावतीसह पुणे जळगाव,भुसावळमार्गे धावणाऱ्या सहा एक्स्प्रेस गाड्या एक ते पाच तास उशिराने धावणार आहेत.

या गाड्यांचा समावेश
११०२५ पुणे-अमरावती एक्सप्रेस ५ ते २३ जानेवारी दरम्यान दीड तास, पुणे हटिया एक्स्प्रेस एक ते दोन तास, पुणे – लखनऊ ६ जानेवारीला अडीच तास तर २० जानेवारीला दीड तास विलंबाने धावेल. पुणे-जबलपूर एक्स्प्रेस ५ जानेवारी रोजी दोन तास आणि १९ जानेवारीला दीड तास, हडपसर -मुझफ्फरपूर २१ जानेवारीला ५ तास, पुणे-हावडा एक्सप्रेस २४ जानेवारीला ४ तास उशिराने धावणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now