साची इंगळे, उत्कर्ष सोनारला रौप्यपदक
जळगाव लिव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । येथील केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टिक्स खेळाडू साची इंगळे व उत्कर्ष सोनार यांनी रौप्यपदक मिळवत यश संपादन केले.
बंगळुरू येथे २५ ते २७ मार्च दरम्यान झालेल्या १६ व्या एरोबिक जिम्नॅस्टिक राष्ट्रीय स्पर्धेत हे पदक मिळवले. या दोघांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्य स्पर्धेत देखील आपल्या वयोगटात उत्कृष्ट प्रदर्शन केले. दोघांनी महाराष्ट्राकडून मिश्र दुहेरी प्रकारात प्रतिनिधित्व केले. त्यांनी पात्रता फेरीत उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर अंतिम फेरीतील उत्कृष्ट आठ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. अंतिम फेरीत देखील सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १३.१० गुण प्राप्त करीत रौप्यपदक मिळवले.
या संघासोबत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. नीलेश जोशी यांनीही राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण करीत या स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका पार पाडली.