महाराष्ट्राशी नमक हरामी करणाऱ्या कोश्यारी नावाच्या पार्सलला तुरुंगात पाठवायच का?
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । महाराष्ट्र्रात येऊन कोश्यारी या माणसाने महाराष्ट्राशी नमखरामी केली आहे. यामुळे पार्सलला घरी किंवा तुरुंगात पाठवा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे म्हणले कि, कोश्यारी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मराठी माणसाचा अपमान झाला आहे. राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडला आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari Statment) नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतात. महाविकास आघाडी आणि राज्यपालांचे तर कधीच पटले नाही. नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत एक विधान केले असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.उद्धव ठाकरे यांनी कोषारी यांच्या या वक्त्यव्याचा चांगलाच समाचार घेतला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेने या विधानावरून राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका करतानाच शिंदेगट आणि भाजपची कान उघाडणी केली आहे. राऊतांनी एकापाठोपाठ चार ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. राज्यात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला आहे. थोडा जरी स्वाभिमान आणि अभिमान असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्या. अथवा शिवसेनेचं नाव घेऊ नका, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. मुंबई आमचा प्राण आहे, त्याबाबात एकही अपशब्द ऐकून घेणार नाही, अशी भूमिका राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी घेतली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांचा समाचार घातला.