
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । वरणगाव शहरातील व्यापार्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याबाबत भाजपा पदाधिकार्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची मंत्री महाजन यांनी दखल घेत पोलिस प्रशासनाला दुकानांची वेळ 11 पर्यंत ठेवण्याच्या सूचना केल्याने व्यापारीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, व्यापारी संघटनेचे जिल्ह्याचे नेते संजय कुमार जैन यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांना निवेदन देण्यात आले होते. कोरोना काळामुळे व्यापारी आधीच उद्ध्वस्त झाली असून आता केवळ 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवता येत असल्याने व्यापारीवर्गाचे आर्थिक नुकसान होत असल्याने दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली.
प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष शामराव धनगर, ज्येष्ठ नेते कदिर सेठ, मनोहर सराफ, हाजी अल्लाद्दीन सेठ, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, जिल्हा चिटणीस अरुण बावणे, भाजयुमो शहराध्यक्ष आकश निमकर, सरचिटणीस कैलाश पाटील, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, शहराध्यक्ष डी.के.खाटीक, पप्पू ठाकरे, अनिल वंजारी, प्रकाश कुंभार, के.के.अंभोरे, राजू सेठ जैन, गजानन बारुळकर, राहुल जंजाळे, शुभम आमोदकर, रॉक कश्यप, हितेश चौधरी, ऋषिकेश कोलते, ईश्वर माळी यांच्यासह असंख्य व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







