⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

पाचोरा येथे दुकानदाराची १५ हजारात फसवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । पाचोरा येथील किराणा दुकानदाराने सोशल मिडियावर मसाला विक्री करणाऱ्या पोस्टवर संपर्क साधून २० हजार रूपयांच्या मालाची ऑर्डर दिली. मात्र, १५ दिवस उलटूनही माल न आल्याने, संबंधितास संपर्क साधला असता त्याने ५ हजार रूपये परत केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकानदाराने पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला.

मराठे शाॅपिंग काॅम्पलेसमधील होलसेल किराणा व्यापारी गणेश केसवाणी यांचा पुतन्या प्रिन्स केसवाणी याने ब्लॅकपेपर ट्रेडिंग मार्केटवर काही दिवसांपुर्वी मसाले विक्रीची जाहिरात वाचून लाईक केली. त्यानंतर प्रिन्स याला ६३५५०३९७९७ या क्रमांकावरून फोन आला, व तुम्हाला मसाले हवे आहेत का? अशी विचारणा केली हाेती. दरम्यान, प्रिन्सचे काका गणेश केसवाणी यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिली. हेड काॅस्टेबल विनोद पाटील तपास करत आहेत.