जळगाव जिल्हामहाराष्ट्र

आता महिलाच नव्हे, पुरुषांनाही मिळणार एसटीच्या प्रवासात विशेष सवलत ; परिवहन मंत्र्यांची घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । गेल्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. अनेक महिला या सवलतीचा लाभ घेताना दिसत आहे. दरम्यान एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. ती म्हणजे आता महिलाच नव्हे तर पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत मिळणार आहे.

bus 3 jpg webp

एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत देण्याची घोषणा यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली. कमी गर्दी असणाऱ्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा सरनाईक यांनी केली. फ्लेक्सी फेअर असं या योजनेचं नाव असेल. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.

फ्लेक्सी फेअर योजना नेमकी काय आहे ?
जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च यादरम्यान एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या कमी असते. प्रवाशांची संख्या कमी असली, तरी एसटीला खर्च तितकाच येतो. त्यामुळे फ्लेक्सी फेअर योजना या काळात लागू केल्यास एसटी महामंडळाला मोठा फायदा होऊ शकतो, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे ही योजना एसटीसाठी फायद्याची ठरेल, असे सांगण्यात येतेय.

तिकिटामध्ये किती कपात होणार ?
समजा, जळगाव ते पुणे यादरम्यान लालपरी बसचे तिकिट ६१५ रूपये आहे. जर गर्दी कमी असणाऱ्या हंगामात तुम्ही आधीच तिकिट बुक केले. तर हे तिकिट तुम्हाला ५२३ रूपयांना मिळेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button