जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । भडगाव तालुक्यातील वाडे बांबरूड शिवारातील शेतात असलेल्या शेळ्यांच्या वाड्यावर लांडग्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यात शेळीची ६ पिले ठार, तर एक गंभीर जखमी झाले. यामुळे शेळी मालकाचे जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील वाडे बांबरूड प्र.ब.शिवारात सुरतसिंग सरदारसिंग परदेशी यांच्या शेतात शनिवारी सकाळी मोसंबी, लिंबू बाग व झोपडीत शेळीचे मृत पिले आढळून आली. त्यावेळी या घटनेचा उलगडा झाला. या शेतशिवारात लांडग्यांसह वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असतो. परदेशी यांचे हे शेत कजगाव वाडे रस्त्यानजीक व गिरणा जामदा डाव्या कालव्याला लागून आहे.

या शेतात हे विनोद भिल्ल यांचा परिवार राहतो. शेळीपालन व मोलमजुरी करून ते परिवाराचा उदरनिर्वाह चालवितात. आता शेळ्याच ठार झाल्याने या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. पशुपालक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वनविभागाने तात्काळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
हे देखील वाचा :
- पोलीस दलाच्या दिमतीला १२ नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते लोकार्पण
- जळगावच्या शेतकऱ्यांनो..! हरभरा-मसूर पिकासाठी मिळणार १० हजारांचे अनुदान; ‘असा’ करा अर्ज
- शरद पवार जळगावात येणार? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी निमंत्रण
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ
- ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’; फिजिओ गणेशाला निरोप






