धक्कादायक : जावयानेच केला सासूचा विनयभंग!

सप्टेंबर 25, 2022 7:22 PM

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । बायकोला माझ्यासोबत आत्ताच पाठवा नाहीतर तुम्ही चला असे अपशब्द वापरून जावयाने सासूचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना चाळीसगावच्या बहाळ रथाचे गावात घडली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांत जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 09 03T132219.635 1 jpg webp

सविस्तर घटना अशी की, अमळनेर येथील तरूणाची सासुरवाडी चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील आहे. कौटुंबिक वाद असल्याने पत्नी ही माहेरी निघून गेली. पत्नीला घेण्यासाठी पती हा सासुरवाडीला दि. २४ सप्टेंबर रोजी गेला. पती घेण्यासाठी आला परंतू पत्नीने सोबत जाण्यास नकार दिला. त्यावेळी पत्नीची आई म्हणजेच सासू देखील घरीच होती. दरम्यान, जावयाने सासूला उद्देशून बोलत “माझी बायको तुमच्याकडे आहे. तिला माझ्यासोबत आत्ताच पाठवा, नाहीतर तुम्हीच माझ्यासोबत चला” असे अपशब्द वापरून सासूचा हात पकडला व तिच्या अंगावरील साडी ओढली. तसेच शालकाचा पाहून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ करून निघून गेला.

या प्रकरणी सासूने मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जावयावर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now