⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | धक्कादायक ! शेतातील झाडाला प्रेमी युगलाने घेतला गळफास

धक्कादायक ! शेतातील झाडाला प्रेमी युगलाने घेतला गळफास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । प्रेमी युगुलाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी येथे उघडीस आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस घटनास्थळी रवाना झाले.

अधिक माहिती अशी की, तालुक्यात विश्राम जिन्सी येथे एका मुलाने व मूलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवक आणि युवती ही अविवाहीत असुन गावापासुन जवळच काही अंतरावर असलेल्या शेतातील झाडाला दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. प्रकरणातुन या दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी कुजबुज ग्रामस्था मध्ये केली जात आहे. रावेर पोलिस निरिक्षक कैलास नागरे, पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे आदि सहका-यांसह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. दोघांची आत्महत्या केली असल्याची पोलिसांची प्राथमिक माहीती आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह