धक्कादायक : मध्यरात्री राहत्या घरात तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

सप्टेंबर 7, 2022 2:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । शहरातील रामेश्वर कॉलनीत वास्तव्यास आलेल्या २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात मध्यरात्री तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 20 jpg webp

विजय यशवंत अटकाळे (वय-२८) रा. सिध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय अटकाळे हा पत्नी व मुलासह रामेश्वर कॉलनीतील सिध्दार्थ नगरात वास्तव्याला होते. मिळेल तशी मजूरी व हमाली काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसापासून त्यांची पत्नी माहेरी गेलेल्या होत्या.

त्यामुळे ते घरी एकटेच होते. मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री गल्लीतील नातेवाईकांशी गप्पा मारून रात्री घरी गेले. मध्यरात्री विजयने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बुधवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. यासंदर्भात शेजारी राहणाऱ्यांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली.

पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात वडील यशवंत गोविंद अटकाळे, आई शिला, भाऊ राकेश, दोन विवाहित बहिणी, पत्नी गिता व मुलगा परिष असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now