धक्कादायक ! वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेची अठरा लाखांची पाईप लाईन चोरट्यांनी लांबवली

सप्टेंबर 3, 2022 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा धरण ते दीपनगर केंद्रादरम्यानची वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेची तब्बल ११ लाख ६६ हजार १३१ रुपये किंमतीची पाईप लाईन चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता फुलगाव-तळवेल-ओझरखेडा गावठाण जमिनीवर तब्बल १८ लाख रुपये किंमतीची पाईप लाईन चोरट्यांनी गॅस कटरद्वारे लांबवल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सन २०१२ ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान ही चोरी झाल्यानंतर संबंधित विभागाला जाग आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या विभागाचा कारभारही उघड झाला आहे.

jalgaon crime 1 3 jpg webp

गॅस कटरचा वापर करीत लांबवली पाईप लाईन

मौजे तळवेल, फुलगाव व ओझरखेडा शिवारात वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेची पाईप लाईन अंथरण्यात आली असून चोरट्यांनी २०१२ ते २०ऑगस्ट २०२२ दरम्यान केव्हातरी संधी साधून तब्बल तीन हजर६०० किलो वजनाची व १४ मिलिमीटर जाडीची पाईप लाईन गॅस कटरचा वापर करून लांबवल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल दहा वर्षांच्या कालावधीत हा प्रकार घडल्यानंतर संबंधित विभागाने गुरुवारी वरणगाव पोलिसात तक्रार दाखल केल्याने या विभागाचा कारभार उघड झाला आहे. तळवेल उपसा सिंचन बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तुषार रामचंद्र राजपूत (२८, खोटेनगर, जळगाव) यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी १२ लाखांच्या पाईप-लाईनची चोरी

पिंप्रीसेकम शिवारातील गावठाण जमिनीवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकिची ओझरखेडा धरण ते दीपनगर केंद्रादरम्यानची ८६३ ट्रीक टन वजनाची व ११ लाख ६६ हजार १३१ रुपये किंमतीची पाईप लाईन चोरट्यांनी १५ जुलै ते २०ऑगस्टच्या दरम्यान केव्हातरी लांबवली होती. या प्रकरणी भुसावळ पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now