धक्कादायक : इयत्ता ६वीच्या मुलीवर शिक्षकानेच..!

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२३ । राज्यातील एका प्रमुख शहरात ‘शिक्षक’ या शब्दाला लांछन लावण्याचे काम एका शिक्षकाने केले असल्याचे वृत्त समोर आले आहे. पेशाला काळिमा फासणारी एक बातमी समोर आली आहे. नागपुरात नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित विद्यार्थीनी सहाव्या वर्गात शिकत असून ती वय १२ वर्षांची आहे. संजय विठ्ठल पांडे असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी सक्करदरा पोलिस ठाण्यात धाव घेतली असून या बाबत तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या मुसक्या आवळ्या आहेत. सध्या या प्रकरणी पोलीस अधित चौकशी करत आहेत.